जगात या जगण्यासाठी मज साथ हवी ,
भवसागरात या तरण्यासाठी साथ हवी ,
सुखात नांदणारी खट्याळ साथ अशी हवी ,
दुखात अश्रू टिपणारी मज साथ हवी.
वेलीवर फुलणाऱ्या फुलासारखी साथ हवी ,
गुंजारव करणाऱ्या भुंग्यासारखी साथ हवी
झाडावर पानामधून मधुर फळांची साथ हवी
किलबिलाटात दंग अशा पाखरांची साथ हवी .
स्मृतीत हरवून जाणारी मज साथ हवी
बघता क्षणात खुलणारी मज साथ हवी
आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलताना
दिलबहार फुलणारी मज साथ हवी ,
मित्रासारखी प्रकाश देणारी मज साथ हवी
पाठ ना सोडणारी सावलीसारखी साथ हवी.
चुकता निर्णय मार्ग दाखवणारी साथ हवी
नसता कुणीहि बरोबर हाथ धरणारी साथ हवी .
रात्रीला दिवस आणि दिवसालाही रात्र हवी
जशी आत्म्याला शरीराची तशी मज साथ हवी
आयुष्यात या जगताना न तुटणारी साथ हवी
मित्र समाजाबरोबर कुटुंबियांची हि साथ हवी.
कवी - राहुल भोसले
दिनांक २५/०७/२०१०
मोबाईल: ०९८९३९९०५१७
email: rgbhosale@gmail.com
RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]