Saturday, August 07, 2010

My colourful photography


RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

Sunday, August 01, 2010

मैत्री


काय झाले आयुष्य कधी सुरु झाले कळले नाही पण कळायला लागल्यावरही मैत्रीने कधीच साथ सोडली नाही कधी लंगोटीयार, वर्ग मित्र , कॉलेज मित्र , खोली मित्र  आणि या प्रत्येकातून निवडलेले जिवलग मित्र यांची वेळोवेळी साथ प्रेरणा सहवास विकास कधी सुखी कधी दुखही काळाप्रमाणे मोजत गेलो अजूनही मित्र आहेत जीवापासून जपलेले काही त्यात भर घालतात काही काळाच्या ओघात निसटतात पण आठवणी माझ्य्पासून कोणीही हिरावून नाही घेत तुझ्या माझ्या  मैत्रीचा उपयोग या जगाच्या, समाजाच्या, निसर्गाच्या  विकासासाठी व्हावा हिच ईश्वरचरणी आजच्या मित्रातादिनानिम्मित्त प्रार्थना  ...... आणि सर्वाना शुभेच्छा....!!!   


 
RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

Sunday, July 25, 2010

जगात या जगण्यासाठी मज साथ हवी ,
भवसागरात या तरण्यासाठी साथ हवी ,
सुखात नांदणारी खट्याळ साथ अशी हवी ,
दुखात अश्रू टिपणारी मज साथ हवी.

वेलीवर फुलणाऱ्या फुलासारखी साथ हवी ,
गुंजारव करणाऱ्या भुंग्यासारखी साथ हवी 
झाडावर पानामधून मधुर फळांची साथ हवी
किलबिलाटात दंग अशा पाखरांची साथ हवी .

स्मृतीत हरवून जाणारी मज साथ हवी 
बघता क्षणात खुलणारी मज साथ हवी 
आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलताना 
दिलबहार फुलणारी मज साथ हवी ,

मित्रासारखी प्रकाश देणारी मज साथ हवी 
पाठ ना सोडणारी सावलीसारखी साथ हवी.
चुकता निर्णय मार्ग दाखवणारी साथ हवी 
नसता कुणीहि बरोबर हाथ धरणारी साथ हवी .

रात्रीला दिवस आणि दिवसालाही  रात्र हवी
जशी आत्म्याला शरीराची तशी मज साथ हवी 
आयुष्यात या जगताना न तुटणारी साथ हवी 
मित्र समाजाबरोबर कुटुंबियांची हि साथ हवी.

कवी - राहुल भोसले 
दिनांक २५/०७/२०१० 
मोबाईल: ०९८९३९९०५१७ 
email: rgbhosale@gmail.com 

RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

Thursday, April 22, 2010

भावपूर्ण आदरांजली....!!!



रोज कोण हरवते
रोज काही गवसते
हरवल्याने केलेले
गेल्यावर समजते

चांदण्या उगवतात
रोज मावळतात
कधीतरी एखादी
तुटताना दिसते

तुटलेले नसले की
जागच्या जागी
तुटलेल्या ताऱ्याचे
महत्व समजते

प्रकाश देवून सूर
गेलेला असतो दूर
मनात असते हुरहूर
कित्येक प्रकाशवर्षे

कवितांचा ठेवा
असतो बहुमोल
हृदयात ठेवावा
जपून अनमोल

तुटलेल्या तार्याची
आयुष्यवेल संपली
कवितेतून कवीला
भावपूर्ण आदरांजली....!!!


कवी - राहुल भोसले
रविवार/ १४.०३.२०१०
मो. ०९८९३९९०५१७
email: rgbhosale@gmail.com

RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

काय झालेय माहित नाही मी बदलायचे ठरवलय




काय झालेय माहित नाही मी बदलायचे ठरवलय
रोज सकाळी सुर्योदया अगोदर फिरायचं ठरवलय
कित्येक आठवणीतून भरपूर फिरल्याचे सुचतय
लहानपण अगदी डोळ्यासमोर बागडताना दिसतंय


काय झाले माहित नाही फिरायचे कसे आवडले
बालपणात आवड होती तेव्हा सगळ्यांनी अडवले
तरीही वेळ मिळेल तेव्हा कुठेही दौडताच राहिलो
नद्या झरे डोंगरदऱ्या पशुपक्षी पाहतच राहिलो 


काय झाले माहित नाही साधने होती फार कमी
फिरायला जायचे म्हणाले की अडचणीची नक्की हमी
झाडांना जपत जपत अडचणीना तोडतच राहिलो
निसर्गाकडे बघत बघत होकारार्थ शिकतच राहिलो


काय झाले माहित नाही आता खूप काही बदललय
सिमेंटच्या जंगलात आणि माणसात सगळेच हरवलंय
निसर्गाच्या अति ऱ्हासामुळे परिणाम जाणवू लागलेत
पर्यावरण बचाव संस्थाही खूप ओरडून सांगू राहिलेत 


काय झाले माहित नाही मी खूप ठरवलय बदलायचं
निसर्गाला वाचवण्यासाठी सकारात्मक काम करायचं
मनापासून साद घालतोय मित्रानो सर्वांनी सुरुवात करा
निसर्गाला समजण्यासाठी निसर्गातच फिरा...निसर्गातच फिरा..... 


कवी - राहुल भोसले
शनिवार/१३.०३.२०१०
मो. ०९८९३९९०५१७
email: rgbhosale@gmail.com 


RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

Sunday, April 18, 2010

पण शब्द कवितारुपी उरतील



रात्र आहे खूप अजुनी वेळ कसा हा जाईना
ओढ आहे माझ्या मनी तुला भेटता येईना
पौर्णिमेच्या भरतीला पाणी खाली होईना
मनीच्या या वादळाला शांत झोपता येईना

दिवस असे संपून जातील भेटी होतील कशा
मनात आहे जगण्याची भली मोठी आशा
आठवणी या मनात दडल्या असतील अशा
हुडकून काढीन चांदण्यात ध्रुव तारा जशा

ठेवीन त्यांना जसा कोंदणामध्ये हिरा भरुन
आठवणीच्या बंधनात डोकावत राहीन फिरून
भाव माझ्या मनीचे शब्दात उतरुनी येतील
त्याच शब्दांची फुले उद्या फुललेली दिसतील

जगात तू कुठे असशील शब्दांना त्या स्मरशील
स्मरताच त्या शब्दांना गंध दरवळत उठतील
स्मरूनी त्याच गंधाला क्षण उद्याचे स्फूरतील
मी असेल नसेल पण शब्द कवितारुपी उरतील


कवी - राहुल भोसले
शुक्रवार/ १२.०३.२०१०
मो. ०९८९३९९०५१७
email: rgbhosale@gmail.com 


RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

दिनदर्शिका भिंतीवरती***



दिस येती आणि जाती
आमचीही पाने उलटती
पौर्णीमा कधी निरखती
कधी आमोश्या देखती


कधी शुक्ल पक्ष सांगती
कधी कृष्ण हंडी टांगती
कधी जयंतीला पूजती
कधी पुण्यतिथी घालती 


कधी सणावळी दर्शविती
कधी दीपासंगे उजळती
मी इतिहासाला जपती
भविष्यालाही सुनावती


कुणी दिन कामाचे रेखती
कुणी दिन सुट्टीचे आखती
कुणी पाक कृती चाखती
कुणी कला कृती शिकती


वेगळी जरी रंग संगती
प्रकाशने अन निर्मिती
जाहिरात माझी करती
मीच जाहिरात करती 


कित्येक वर्षे अशीच सरती.
परी नववर्षे मलाच स्मरती
मी दिन नामकरण कर्ती
दिनदर्शिका भिंतीवरती*** 


कवी -राहुल भोसले
गुरुवार/ ११/०३/२०१०
मो. ०९८९३९९०५१७ 


RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

मनात दाटले विचार करितो अविचारांची होळी



दिव्याने दिवा पेटविला केली दिव्यांची दिवाळी
पुरवीत पुरण पुन्हा बनविली पुरणाची पोळी
धाग्यात धागा गुंतवून जाळे सुरेख विणतो कोळी
मनी दाटले विचार करितो अविचारांची होळी

कळ्याच कळ्या वेलीवरी हाती सापडली सोनकळी
भ्रमर भ्रमितो फुलावरी तर फुले मिटती फुलपाकळी
फुलात फुले फुलली सुगंध दरवळे त्यांचा वेळोवेळी
मनात दाटले विचार करितो अविचारांची होळी

हास्यात हास्य हसवुनी पडते गाली गुलाबी खळी
रंगात रंग मिसळूनी होई तयार रंगेबिरंगी रांगोळी
अतिरेकी अतिरेक करुनी मग का मारतो गोळी
मनात दाटले विचार करितो अविचारांची होळी

मतास मते देवूनी मतदाते मतदान करतात खुळी
संसदेत सांसद करती गदारोळ अन जनतेचा जाई बळी
स्वतः स्वातंत्र्याच्या कराव्या लागतील का पुन्हा चळवळी
मनात दाटले विचार करितो फक्त अविचारांची होळी


कवी - राहुल भोसले
बुधवार/ १०.०३.२०१०
मो. ०९८९३९९०५१७ 



RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

हल्ली तुझे बोलणे फार फार कमी झालेय....



हल्ली तुझे बोलणे फार फार कमी झालेय....
अन माझ्या मनालाही फार उधान आलेय...
काही दिवसापूर्वी आपली ओळख झाली...
सहज बोलता बोलता गाढ मैत्रीही झाली..

मला आवड होती मने जाणून घेण्याची..
अन तुला मनात दडवून ठेवलेले सांगायची..
तू सांगितले मला मैत्री तोडू नको आपली...
माझ्याकडून कधीही होणार नाही गलती...

अशातच मनातल्या प्रश्नाचे वादळ उठले
हेलकावत पाचोळा उत्तुंग नभात सुटले
मी प्रयत्न केला तुला शमविता ना आले
माहित असताना तू किती प्रयत्न केले..

वादळातील कठीण क्षण मी चटकन सोडवले.
उरलेल्या क्षणांना तू फायद्यासाठी उठवले
काय तुला खरोखरच फायदा झालाय ?
का इतका त्याग फक्त मैत्रीसाठी केलाय ?

देवाने गरज फक्त प्रश्नांसाठी निर्माण केली
तुझी माझी मैत्री फक्त त्या उत्तरांसाठी झाली
त्यासाठी फक्त सवांद हवाय कारण माहितेय..
हल्ली तुझे बोलणे फार फार कमी झालेय....


कवी - राहुल भोसले
मंगळवार /९-०३-२०१०
मो ०९८९३९९०५१७ 


RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

माणूस खऱ्या अर्थाने जगतच नाही.



माणसे कशी हि वेडी वाकडी,
घालतात देवापुढे कित्येक साकडी.
भविष्याचा ठाव ना असे कोणाला,
तरीही रचतात कड्यावर कडी.

हें नाही ते नाही असे म्हणत,
मारतात नेहमीच कोलांटी उडी .
हातचे सुटले की फक्त दोष देत,
म्हणतात नशीबच आहे आपले रडी.

सगळेच कसे फक्त आयते बघतात,
समोरच्यावर अपेक्षांचा डोंगर रचतात.
डोंगराखाली तो कसा चिरडून जाईल
फक्त याचाच नेहमी विचार करतात..

लढतोय एकटाच थोडी मदत करावी,
असे कसे नाही येत यांच्या मनी.
वास्तवाला सत्याला प्रामाणिकपणे ,
साथ द्यावी वाटेल काय क्षणोक्षणी,

प्रत्येकजण आज स्वार्थी झालाय,
काही ना काही मागतच सुटलाय.
करावे नवीन काही छातीठोकपणे,
वाढीव अपेक्षातच गुंतत चाललाय.

घेतलेल्या निर्णयाने भविष्य घडवू,
न घडले भविष्य तर सामोरे जावू.
अशी उमेद का कधी जागत नाही,
माणूस खऱ्या अर्थाने जगतच नाही.


कवी - राहुल भोसले
सोमवार/ ८-३-२०१०.
मो. ०९८९३९९०५१७.


RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

आज तरी माझ्याशी बोलशील....



आज तरी माझ्याशी बोलशील,
असे मला रोज वाटते.
तुझ्याशी बोलताना सखे,
माझे खंबीर मनही सुखावते.

तू सांगणाऱ्या भविष्याचा,
मी बराच मागोवा घेतला.
अनुभवाच्या प्रात्यक्षिकाने,
भविष्य हि खोटे ठरले..

जुळते जिथे मन माझे ,
तिथे तू मृगजळ भासवते.
जुळवितो जिथे मन माझे,
त्यांच्या अपेक्षा वाढत असे.

विकसित मानाने चालूनियाही,
अविकसित सदा मी भासतो.
मी कित्येकांना साथ दिली,
तरीही मी एकटाच वाटतो.

त्या एकटेपणाला साथ म्हणून,
वाट तुझी मी पाहतो आहे.
आज तरी माझ्याशी बोलशील,
असे मला रोज वाटते आहे... 


कवी - राहुल भोसले
रविवार ०७/०३/२०१०
[ मो. ०९८९३९९०५१७] 



RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

Friday, March 26, 2010

My poems