Sunday, April 18, 2010

पण शब्द कवितारुपी उरतील



रात्र आहे खूप अजुनी वेळ कसा हा जाईना
ओढ आहे माझ्या मनी तुला भेटता येईना
पौर्णिमेच्या भरतीला पाणी खाली होईना
मनीच्या या वादळाला शांत झोपता येईना

दिवस असे संपून जातील भेटी होतील कशा
मनात आहे जगण्याची भली मोठी आशा
आठवणी या मनात दडल्या असतील अशा
हुडकून काढीन चांदण्यात ध्रुव तारा जशा

ठेवीन त्यांना जसा कोंदणामध्ये हिरा भरुन
आठवणीच्या बंधनात डोकावत राहीन फिरून
भाव माझ्या मनीचे शब्दात उतरुनी येतील
त्याच शब्दांची फुले उद्या फुललेली दिसतील

जगात तू कुठे असशील शब्दांना त्या स्मरशील
स्मरताच त्या शब्दांना गंध दरवळत उठतील
स्मरूनी त्याच गंधाला क्षण उद्याचे स्फूरतील
मी असेल नसेल पण शब्द कवितारुपी उरतील


कवी - राहुल भोसले
शुक्रवार/ १२.०३.२०१०
मो. ०९८९३९९०५१७
email: rgbhosale@gmail.com 


RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

दिनदर्शिका भिंतीवरती***



दिस येती आणि जाती
आमचीही पाने उलटती
पौर्णीमा कधी निरखती
कधी आमोश्या देखती


कधी शुक्ल पक्ष सांगती
कधी कृष्ण हंडी टांगती
कधी जयंतीला पूजती
कधी पुण्यतिथी घालती 


कधी सणावळी दर्शविती
कधी दीपासंगे उजळती
मी इतिहासाला जपती
भविष्यालाही सुनावती


कुणी दिन कामाचे रेखती
कुणी दिन सुट्टीचे आखती
कुणी पाक कृती चाखती
कुणी कला कृती शिकती


वेगळी जरी रंग संगती
प्रकाशने अन निर्मिती
जाहिरात माझी करती
मीच जाहिरात करती 


कित्येक वर्षे अशीच सरती.
परी नववर्षे मलाच स्मरती
मी दिन नामकरण कर्ती
दिनदर्शिका भिंतीवरती*** 


कवी -राहुल भोसले
गुरुवार/ ११/०३/२०१०
मो. ०९८९३९९०५१७ 


RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

मनात दाटले विचार करितो अविचारांची होळी



दिव्याने दिवा पेटविला केली दिव्यांची दिवाळी
पुरवीत पुरण पुन्हा बनविली पुरणाची पोळी
धाग्यात धागा गुंतवून जाळे सुरेख विणतो कोळी
मनी दाटले विचार करितो अविचारांची होळी

कळ्याच कळ्या वेलीवरी हाती सापडली सोनकळी
भ्रमर भ्रमितो फुलावरी तर फुले मिटती फुलपाकळी
फुलात फुले फुलली सुगंध दरवळे त्यांचा वेळोवेळी
मनात दाटले विचार करितो अविचारांची होळी

हास्यात हास्य हसवुनी पडते गाली गुलाबी खळी
रंगात रंग मिसळूनी होई तयार रंगेबिरंगी रांगोळी
अतिरेकी अतिरेक करुनी मग का मारतो गोळी
मनात दाटले विचार करितो अविचारांची होळी

मतास मते देवूनी मतदाते मतदान करतात खुळी
संसदेत सांसद करती गदारोळ अन जनतेचा जाई बळी
स्वतः स्वातंत्र्याच्या कराव्या लागतील का पुन्हा चळवळी
मनात दाटले विचार करितो फक्त अविचारांची होळी


कवी - राहुल भोसले
बुधवार/ १०.०३.२०१०
मो. ०९८९३९९०५१७ 



RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

हल्ली तुझे बोलणे फार फार कमी झालेय....



हल्ली तुझे बोलणे फार फार कमी झालेय....
अन माझ्या मनालाही फार उधान आलेय...
काही दिवसापूर्वी आपली ओळख झाली...
सहज बोलता बोलता गाढ मैत्रीही झाली..

मला आवड होती मने जाणून घेण्याची..
अन तुला मनात दडवून ठेवलेले सांगायची..
तू सांगितले मला मैत्री तोडू नको आपली...
माझ्याकडून कधीही होणार नाही गलती...

अशातच मनातल्या प्रश्नाचे वादळ उठले
हेलकावत पाचोळा उत्तुंग नभात सुटले
मी प्रयत्न केला तुला शमविता ना आले
माहित असताना तू किती प्रयत्न केले..

वादळातील कठीण क्षण मी चटकन सोडवले.
उरलेल्या क्षणांना तू फायद्यासाठी उठवले
काय तुला खरोखरच फायदा झालाय ?
का इतका त्याग फक्त मैत्रीसाठी केलाय ?

देवाने गरज फक्त प्रश्नांसाठी निर्माण केली
तुझी माझी मैत्री फक्त त्या उत्तरांसाठी झाली
त्यासाठी फक्त सवांद हवाय कारण माहितेय..
हल्ली तुझे बोलणे फार फार कमी झालेय....


कवी - राहुल भोसले
मंगळवार /९-०३-२०१०
मो ०९८९३९९०५१७ 


RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

माणूस खऱ्या अर्थाने जगतच नाही.



माणसे कशी हि वेडी वाकडी,
घालतात देवापुढे कित्येक साकडी.
भविष्याचा ठाव ना असे कोणाला,
तरीही रचतात कड्यावर कडी.

हें नाही ते नाही असे म्हणत,
मारतात नेहमीच कोलांटी उडी .
हातचे सुटले की फक्त दोष देत,
म्हणतात नशीबच आहे आपले रडी.

सगळेच कसे फक्त आयते बघतात,
समोरच्यावर अपेक्षांचा डोंगर रचतात.
डोंगराखाली तो कसा चिरडून जाईल
फक्त याचाच नेहमी विचार करतात..

लढतोय एकटाच थोडी मदत करावी,
असे कसे नाही येत यांच्या मनी.
वास्तवाला सत्याला प्रामाणिकपणे ,
साथ द्यावी वाटेल काय क्षणोक्षणी,

प्रत्येकजण आज स्वार्थी झालाय,
काही ना काही मागतच सुटलाय.
करावे नवीन काही छातीठोकपणे,
वाढीव अपेक्षातच गुंतत चाललाय.

घेतलेल्या निर्णयाने भविष्य घडवू,
न घडले भविष्य तर सामोरे जावू.
अशी उमेद का कधी जागत नाही,
माणूस खऱ्या अर्थाने जगतच नाही.


कवी - राहुल भोसले
सोमवार/ ८-३-२०१०.
मो. ०९८९३९९०५१७.


RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]

आज तरी माझ्याशी बोलशील....



आज तरी माझ्याशी बोलशील,
असे मला रोज वाटते.
तुझ्याशी बोलताना सखे,
माझे खंबीर मनही सुखावते.

तू सांगणाऱ्या भविष्याचा,
मी बराच मागोवा घेतला.
अनुभवाच्या प्रात्यक्षिकाने,
भविष्य हि खोटे ठरले..

जुळते जिथे मन माझे ,
तिथे तू मृगजळ भासवते.
जुळवितो जिथे मन माझे,
त्यांच्या अपेक्षा वाढत असे.

विकसित मानाने चालूनियाही,
अविकसित सदा मी भासतो.
मी कित्येकांना साथ दिली,
तरीही मी एकटाच वाटतो.

त्या एकटेपणाला साथ म्हणून,
वाट तुझी मी पाहतो आहे.
आज तरी माझ्याशी बोलशील,
असे मला रोज वाटते आहे... 


कवी - राहुल भोसले
रविवार ०७/०३/२०१०
[ मो. ०९८९३९९०५१७] 



RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]