Sunday, July 25, 2010

जगात या जगण्यासाठी मज साथ हवी ,
भवसागरात या तरण्यासाठी साथ हवी ,
सुखात नांदणारी खट्याळ साथ अशी हवी ,
दुखात अश्रू टिपणारी मज साथ हवी.

वेलीवर फुलणाऱ्या फुलासारखी साथ हवी ,
गुंजारव करणाऱ्या भुंग्यासारखी साथ हवी 
झाडावर पानामधून मधुर फळांची साथ हवी
किलबिलाटात दंग अशा पाखरांची साथ हवी .

स्मृतीत हरवून जाणारी मज साथ हवी 
बघता क्षणात खुलणारी मज साथ हवी 
आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलताना 
दिलबहार फुलणारी मज साथ हवी ,

मित्रासारखी प्रकाश देणारी मज साथ हवी 
पाठ ना सोडणारी सावलीसारखी साथ हवी.
चुकता निर्णय मार्ग दाखवणारी साथ हवी 
नसता कुणीहि बरोबर हाथ धरणारी साथ हवी .

रात्रीला दिवस आणि दिवसालाही  रात्र हवी
जशी आत्म्याला शरीराची तशी मज साथ हवी 
आयुष्यात या जगताना न तुटणारी साथ हवी 
मित्र समाजाबरोबर कुटुंबियांची हि साथ हवी.

कवी - राहुल भोसले 
दिनांक २५/०७/२०१० 
मोबाईल: ०९८९३९९०५१७ 
email: rgbhosale@gmail.com 

RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09893990517]